फिस्कुटी: कोळसा खणावा तीतका काळाच असे म्हणतात, याची प्रचिती फिस्कुटी ग्राम पंचायतीच्या घोटाळ्यावर नजर टाकले की, लक्षात येते. या ग्राम पंचायतीत सरपंच, ग्रामसेवकांनी मिळून ऐवढे घोटाळे केले आहे कि, हे पदाधिकारी केवळ घोटाळे करण्यासाठी पदावर आलेत काय? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. संगणक, नसलेल्या वाचनालयाच्या फर्नीचरनंतर, आता याच ग्राम पंचायतीचा 'खुर्ची घोटाळा' पुढे आला असून, माहितीच्या अधिकारातून ग्राम पंचायत फिस्कुटी यांनीच दिलेल्या माहितीतून हा घोटाळा उघडकीस आला आहे. घोटाळ्यातील कमीशन वाढावी यासाठी अनावश्यक आणि बाजाराभावाजाच्या तीन ते दहापट अधिक किंमतीत या खुर्चा खरेदी करण्यात आल्यांचे उपलब्ध बिलावरून आणि बाजार भावावरून स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संध्याताई गुरूनुले असतांना सन 2020—2021 या आर्थिक वर्षात ग्राम पंचायत फिस्कुटी यांना स्टील खुर्च्या पुरविण्याकरीता 3 लाख रूपये मंजूर करण्यात आले. यातून 30 'एअरपोर्ट चेअर' वृंदा एन्टरप्राईजेस घुग्गूस यांचेकडून खरेदी करण्यात आल्यांचे उपलब्ध बिलावरून स्पष्ट होत आहे. प्रत्येकी 10 हजार रूपये याप्रमाणे एकूण 30 एअरपोर्ट चेअरचे 3 लाख रूपयाचे बिल ग्राम पंचायतीला देण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे, बिलात, एकुण खुर्च्याची रक्कम 3 लाख रूपये दर्शविण्यात आली तरी, 18 टक्के जीएसटीचे 45762 रूपयाची वेगळे दर्शविण्यात आले, मात्र करासहीत बिलही 3 लाखाचेच करण्यात आल्यांने, हा बिल खरा आहे काय? यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बिल खरे असेल तर वृंदा एंटरप्राईजेसची जीएसटी घोटाळा केला असल्यांचाही संशय आहे.
बाजारभावाप्रमाणे एअरपोर्ट चेअर 4 ते 5 हजारात मिळत असल्यांने या व्यवहारात अर्ध्यापेक्षा अधिक रक्कमेचा घोटाळा झाल्यांचा संशय असून, चौकशी केल्यास, सरपंच—ग्रामसेवक 'बाराच्या भावात' जातील अशी प्रतिक्रिया गावकरी व्यक्त करीत आहे. उल्लेखनीय म्हणजे रेकार्डवर 30 खुर्ची असली तरी, प्रत्यक्षात मात्र ऐवढ्या खुर्च्या आणल्याच नसल्यांने त्या दिसतही नाही याकडे एका नागरीकांनी आमचे प्रतिनिधीचे लक्ष वेधले.
या स्टिल खुर्च्या व्यतिरिक्त जिल्हानिधी अंतर्गतच ग्राम पंचायतला फर्निचर पुरविण्यासाठी 3 लाख रूपये मंजूर करण्यात आले. या खुर्चाची खरेदी क्रांती एंटरप्राईजेस चंद्रपूरकडून करण्यात आली. यात व्हिजीटर चेअर जी बाजारभावाप्रमाणे 2 ते अडिच हजारात मिळते, तीच खुर्ची 11,918 प्रमाणे खरेदी करण्यात आली. यात पाच पट अधिक किमंत देवून ही खरेदी करण्यात आली तर 3 नग आॅफीस हायबॅक खुर्ची जी बाजारभावाप्रमाणे 5 ते 7 हजारात मिळते, तीच खुर्ची फिस्कुटी ग्राम पंचायतीने 20,546 म्हणजे 4 पट अधिक किमंत देवून खरेदी करण्यात आले. विशेष म्हणजे, या सर्व खरेदीत जेवढा निधी जिल्हा परिषदेकडून फिस्कुटी ग्राम पंचायतीला देण्यात आली, तेवढ्याच रक्कमेचे कोटेशन मिळाले आणि बिलही तेवढ्याच रक्कमेचे दिसत असल्यांने, ठरवून केलेला हा घोटाळा असल्यांचे स्पष्ट होत आहे.
उल्लेखनीय म्हणजे, 6 लाख रूपये किमंतीचे खुर्च्या खरेदी करण्यांची फिस्कुटी ग्राम पंचायतीला कोणतीही आवश्यकता नव्हती, मात्र केवळ कमीशन करीता ही खरेदी करण्यात आल्यांचा आरोप आता होत आहे. मूल तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीना आवश्यक फर्नीचर नाही, या ग्रामपंचायतीला आवश्यक फर्नीचर करीता 50—50 हजार दिले असते तरी, 12 ग्रामपंचायतीना हा निधी देता आला असता, मात्र पुत्रप्रेमापोटी आणि त्यातून मिळणार्या कमीशनसाठी गरज नसतांना, फिस्कुटी ग्राम पंचायतीला हा ऐवढा मोठा निधी देण्यात आल्यांचा आरोप केला जात आहे. खुर्चीच्या दोनही 6 लाखाच्या व्यवहारात 4 लाखाचा घोटाळा झाल्यांचा आरोप होत आहे.
मूल शहरात खुर्ची पुरविणारे ठोक विक्रेते आहेत. येथून जिल्हाभर चिल्लर विक्रेचे फर्नीचर नेत असतात. असे असतानाही, एवढ्या मोठ्या प्रमाणातील प्रत्येक खरेदीसाठी 'घुग्गुस' येथील एका विशिष्ट दुकानाचीच का निवड केल्या जाते? असा प्रश्नही आता उपस्थित होत असून, याचे उत्तर 'कमीशन के लिए सेटिंग'असेच मिळत आहे.
याबाबत ग्रामसेवक दांडेकर यांचेशी वारंवार संपर्क साधला असता, ते आपला भ्रमणध्वनी उचलत नसल्यांने, ग्राम पंचायतीची बाजू देता आली नाही.