लॅपटॉप बिघडल्याने तो दुरुस्तीसाठी पाठवला अन् 70 ते 80 महिलांचे व्हिडीओ झाले व्हायरल


कोल्हापूर: डॉक्टर ला भूतलावरील देव मानल्या जाते. पेशंट आणि त्याचे नातेवाईक डॉक्टरांनी दिलेल्या औषधांवर आणि सल्ल्यावर विश्वास ठेवतात. पण हाच डॉक्टर जर त्याच्या पेशंट सोबत अश्लील चाळे करून त्याच्या क्लिप बनवत असेल तर ? असाच किळसवाणा प्रकार शहरात घडला आहे.येथील एका डॉक्टर ने त्याच्या कडे उपचारासाठी आलेल्या महिलांचे अश्लिल व्हिडीओ बनवले आहेत. आणि ते आपल्या लॅपटॉप मध्ये सेव्ह करून ठेवले होते. लॅपटॉप बिघडल्याने तो दुरुस्तीसाठी पाठवला असता त्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्याने नागरिकांत कमालीचा असंतोष पसरला आहे. जवळपास 70 ते 80 महिलांचे व्हिडीओ व्हायरल झाल्याचे समजत आहे. मुख्य म्हणजे हा डॉक्टर बिगास असल्याची देखील चर्चा आहे.

या डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी यासाठी जवळपास चारशे जणांना एक निनावी पत्र देखील पाठवण्यात आलं आहे. यातूनच हा प्रकार समोर आला आहे.

महिलांसोबत अश्लील चाळे घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हा डॉक्टर आपल्या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलांसोबत अश्लील चाळे करायचा. त्यानंतर तो व्हिडीओ क्लिप बनवायचा.

त्याने हे सर्व व्हिडीओ त्याच्या लॅपटॉपमध्ये स्टोअर करून ठेवले होते. मात्र त्याचा लॅपटॉप त्याने दुरुस्तीसाठी पाठवला आणि या घटनेचा भांडाफोड झाला. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे लॅपटॉप दुरूस्तीसाठी टाकल्यानंतरच या लॅपटॉपमध्ये असलेल्या महिलांच्या सत्तर ते ऐंशी व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. महिला डॉक्टरकडे कंबर दुखीच्या उपचारासाठी गेली असता या डॉक्टरने महिलेला तुम्ही चुकीच्या पद्धतीने सेक्स करता म्हणून तुमची कंबर दुखते असं म्हटल्याचं देखील रेकॉर्ड झालं आहे.

‘सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात हा बोगस डॉक्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या रुग्णालयाची अॅड करत होता. त्यामुळे राज्यभरातूनच नाही तर परराज्यातून रुग्ण त्याच्याकडे उपचारासाठी येत होते. यामध्ये महिला रुग्णांचा देखील समावेश होता. याचाच गौरफायदा या डॉक्टरने घेतला. त्याने महिलांचे अश्लील व्हिडीओ चित्रीत करून आपल्या लॅपटॉपमध्ये स्टोअर करून ठेवले होते