मोलकरणीच्या जीवावर घर सोडून जाताय ? मुंबईतील ही घटना वाचाच ! मालकिणीला लुटले 7 लाखाला


मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कांदिवली पोलिसांनी या भामट्या मोलकराणीला गजाआड केले आहे. दीपिका पवार असं या मोलकरणीचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कांदिवलीमध्ये राहणाऱ्या अनुजा मोदी यांच्या घरी ही दीपिका काम करत होती. अनुजा मोदी आणि त्यांचे पती हे दोघेही नोकरदार आहेत. कामासाठी सकाळी बाहेर जाताना या मोलकरणीकडे ते घरातील कामकाजासाठी घराची चावी सोपवत असायचे.

दरम्यान मोलकरणीने याचाच फायदा घेऊन विश्वास संपादन केला आणि चार महिन्यानंतर मोलकरणीचे दोन डायमंडचे मंगळसूत्र, सात सोन्याच्या अंगठ्या, तीन पिवळ्या धातूचे पेंडंट, एक डायमंड पेंडंट, एक पिवळ्या धातूचे पेंडंट, कानातील चार जोडी बुट्टी, रुद्राक्ष माळ आणि एक मोत्याची कानातली बुट्टी असा एकूण सात लाख 13 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी अनुजा मोदी यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने या चोरीचा उलगडा केला आहे.

दरम्यान पोलिसांनी ही महिला बेसावध असताना तिला पकडून गजाआड केले आहे.