बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी - 'हे' 6 गुण 'या' विद्यार्थ्यांना मिळणार


✍️ इंग्रजीच्या प्रश्‍नपत्रिकेतील कवितेचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहा गुण देण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात आलेला आहे. अशी माहीती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

🧐 *पहा काय आहे कारण?*

📄 प्रिटींग मिस्टेकमुळे पेपरमध्ये मॉडेल अन्सरमधील उत्तरेच छापण्यात आली होती, प्रत्येकी दोन गुण प्रमाणे एकूण सहा गुणांचे हे तीन प्रश्‍न होते. हे प्रश्‍नच विद्यार्थ्यांना समजले नाहीत.

📝 उत्तरपत्रिकेमध्ये Poetry / Section-2 असा उल्लेख केला असल्यास किंवा विद्यार्थ्यांनी Poetry Section-2 मधील अन्य कोणतेही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असेल तर किंवा त्रुटी असलेला प्रश्न क्रमांक (A-3, A-4, 4-5) उत्तरपत्रिकेमध्ये लिहिला असल्यास विद्यार्थ्यांना हे गुण मिळणार असल्याची माहीती आहे.