भरधाव वेगाने येणारी बोलोरो गाडी पलटली,5 जण गंभीर


अहेरी :- 17/3/2023 ला अचानक भरधाव वेगाने येणारी बोलोरो गाडी तेलंगाना राज्यातील सिरपूर तालूका जवळील पेदाबंडा या गावावरून लग्न आटोपून महाराष्ट्रातील छल्लेवाडा स्वगावी परत येताना अहेरी जवळ वांगेपल्ली येथे महाराष्ट्र व तेलंगाना राज्याला जोडणारा पूलाजवळ पलटी मारल्यामुळे गाडीत आठ प्रवाशी पैकी पाच गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ जिल्हारूग्नालय गडचिरोली ला रेफर करण्यात आले मिथून बोरकर ,प्रवीण कुंभारे, जोगय्या सूंदीलवार, माधव मल्ल्या दूर्गे, हे गंभीर जखमी झाले असून तीन प्रवासी सूरेखा शेख, शाहरूख शेख, श्रीलता निष्ठुरवार किरकोळ जखमी झाले आहेत. तात्काळ बातमी कळताच अहेरी तालूक्याचे कांग्रेस पार्टी चे अध्यक्ष डॉ. निसार हकीम . मधूकर सडमेक आदिवासी सेल राघोबा गौरकार ओ. बी. सी सेल नामदेव आत्राम किसान सेल रज्जक भाई तालूका उपाध्यक्ष अशोक आईंचवार व्यापारी संघटना सेल संतोष समूद्दालवार रामप्रसाद मूजंमकार एस सी सेल गणेश उप्पलपवार सरचिटणीस सूरज कोवे सूरेश दूर्गे हे उपस्थित होते. तालुका अध्यक्ष निसार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रूढे साहेब व जि. कांग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष यांना भ्रमणध्वनी ने रूग्णांना उपचार व सहाय्य करण्यात संदर्भात कळविण्यात आले.