सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राचं गिफ्ट! महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला; सरकारवर पडणार 'एवढा' बोजा..


💁🏻‍♂️ मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देत महागाई भत्त्यामध्ये वाढ केली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के करण्यात आलेला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी केंद्र सरकारने खूशखबरी दिली आहे. केंद्राने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामधअये ४ टक्के वाढ केलीय. डीए आणि डीआरएमध्ये ही वाढ जानेवारी २०२३ पासून लागू होईल.

💹 मोदी सरकारच्या कॅबिनेटने घेतलेल्या या निर्णयानंतर महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के झाला आहे. पूर्वलक्षी प्रभवाने ही वाढ लागू होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल.

💰 केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सरकारवर १२ हजार ८१५ रुपयांचा बोजा पडणार आहे. केंद्राच्या या निर्णयाचा फायदा ४७.५८ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. तर ६९.७६ लाख पेन्शनधारकांनाही या निर्णयामुळे लाभ होईल. डीएमध्ये झालेली ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर करण्यात आलेली आहे.