अन् 4 वर्षांच्या मुलाला वाघाने उचलून नेऊन केला ठार



सावली: पासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरमाळा येथील हर्षल संजय कारमेगे वय चार वर्ष हा मुलगा अंगणात आई सोबत असताना नरभक्ष वाघाने हल्ला करून उचलून नेले. हर्षलच्या आईने आरडाओरड केली परंतु तितक्यात वाघ बाळाला घेऊन पसार झाला. पोलीस विभाग, वनविभागाचे कर्मचारी व गावातील नागरिक बाळाचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.




आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 52 बळी वाघाच्या हल्यात गेले आहेत त्यापैकी सावली तालुक्यात १८जणांचा वाघाने बळी घेतलेला असून हर्षल १९ वा बळी पडलेला आहे. चंद्रपूर जिल्हयाचा विचार करता एक तृतीयांश बळी एका सावली तालुक्यातील गेले आहेत ही गांभीर्यची बाब आहे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. हर्षल चे वडील मिरची तोडण्यासाठी आंध्रप्रदेश येथे गेले असून तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या निमित्ताने संपूर्ण तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.