तलाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात, 4 हजारांची लाच घेणे भोवले
अकोला, : बाळापूर तालुक्यातील डोंगरगाव येथील तलाठी राजेश शेळके याला चार हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्याच्या विरुद्ध उरळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी राजेश शेळके डोंगरगाव येथे कार्यरत आहे. त्याचे राहणे संजीवनगर कोठारी वाटिका क्र. 6 मागे, अकोला येथे आहे. त्याने 28 फेब्रुवारी ते 10 मार्चदरम्यान 10 हजार रुपये लाच मागितली होती. त्यापैकी 4 हजार रुपये आगाऊ म्हणून लोहारा येथील तलाठी

कार्यालयात स्वीकारले. तलाठी शेळके याने तक्रारदाराच्या डोंगरगाव येथील वडिलोपार्जित शेतजमिनीचा समान हिस्सा वाटणीसाठी तहसीलदार बाळापूर यांना अनुकूल अहवाल पाठविण्याच्या मोबदल्यात तसेच फेरफार नोंद करून स्वतंत्र सातबारा देण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. राजेश शेळकेविरुद्ध उरळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. एसीबी अकोलाचे उपअधीक्षक यू. व्ही. नामवाडे यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली.