48 वर्षांची महिला चक्क तिच्या 24 वर्षांच्या प्रियकरासोबत पळून गेली


देशात एक खळबळजनक अशी घटना मध्यप्रदेशातील कोलारस पोलीस स्टेशनहद्दीत समोर आलेली असून बेरसिया गावातील एक 48 वर्षांची महिला चक्क तिच्या 24 वर्षांच्या प्रियकरासोबत पळून गेलेली आहे. विशेष म्हणजे या महिलेला चार मुले असून त्यातील दोन मुली या विवाहित असून तिला नातवंडे देखील आहेत.

पीडित महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेत या आधी देखील ही पत्नी याच तरुणासोबत पळून गेलेली असून काही दिवसानंतर परत आली होती मात्र त्यानंतर तिने पुन्हा पलायन केलेले आहे. तिचा तात्काळ शोध घेण्यात यावा अशी विनंती पोलिसांना केलेली आहे. बेरासिया गावातील आदिवासी वस्तीत हा पती राहत असून दुसऱ्या गावातील एका 24 वर्षे तरुणांसोबत तिने पलायन केलेले आहे.

पतीने पुढे म्हटले आहे की ,’ मी तक्रार करेल या भीतीने ती याआधी परत आलेली होती. तिच्या प्रियकराच्या नातेवाईकांनी देखील तिला तक्रारीच्या भीतीने परत पाठवलेले होते मात्र तीन दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा ती पळून गेलेली असून आपला एक पाय काम करत नसल्याने आपण घरात बसून असतो. दोन मुलींची लग्न झालेली असून आपण मुलाच्या लग्नासाठी मुलगी पाहत असतानाच चक्क मुलाची आईच पळून गेलेले असल्याने आता लवकरात लवकर तिला पोलिसांनी शोधून द्यावे ,’ अशी मागणी त्यांनी केलेली आहे.