मिळालेल्या माहिती नुसार पिरमेडा येथील 40 महिला मजुर मोयाबिनपेठा येथील लासमय्या दुर्गम याच्या शेतात मिरची तोडून गावाकडे जात असताना मोयाबिनपेठा गावापासून 1 किमी अंतरावर ट्रॅक्टराची ट्राली उलटल्याने 28 मजूर महिला किरकोळ जखमी तर 12 मजूर महिला गंभीर जखमी झालेल्या आहे. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र मोयाबिनपेठा येथे उपचार सुरू असून 12 मजूर गंभीर जखमी असलेल्या मध्ये सुरक्का बोंदय्या जिल्हापली, लिंगक्का दुर्गय्या चेंनुरी, पेंटक्का किष्टय्या चेंनुरी, सत्यक्का मैसल्ला जिल्हापेली, सुकना व्यंकटी चेंनुरी, कमला राजय्या चेंनुरी, लक्ष्मी लचन्ना चेंनुरी, कमला कटी चेंनुरी, प्रमिला बापू चेंनुरी, चिन्नक्का रामकिष्टु चिलमुला, प्रमिला शंकर चेंनुरी, रामक्का पोचमा कुंटाला यांना उपचारासाठी सिरोंचा येथे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळाली