लाचखोर ! अभियंता म्हणतो, कोंबड्यांचा जेवण आणि 3000 रुपये द्या

गोंदिया, : तक्रारदार यांचे वडिलांचे नावाने महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत सण 2021 – 22 मध्ये गुरांचा गोठा बांधकामा करीता 77 हजार रु. अनुदान मंजूर झाले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये गुरांचा गोठ्याचे बांधकाम पूर्ण केले सदर बांधकाम व बांधकामाचे बिलाची तपासणी करून बरोबर असल्याचा शेरा नमूद करून बिल मंजुरी करिता पाठविण्याकरिता आरोपी याने तक्रारदाराकडून या आधी 5,000 रु. घेतले.

असून आणखी 3,000 रु. लाच रकमेची मागणी करून पळताळणी दरम्यान पंचासमक्ष तळजोळी अंती 2,000 रु. लाच रकमेची व कोंबड्याचे जेवणाची मागणी करून


आज दिनांक 14/03/2023 रोजी सापळा कार्यवही दरम्यान आरोपी जगदीश सदाशिव रहांगडाले वय 34 वर्ष रा. भुताईटोला, तालुका – गोरेगाव, कनिष्ठ अभियंता (कंत्राटी), पंचायत समिती – गोरेगाव, याने तक्रारदाराकडुन गोंदिया ते गोरेगाव रोडवरील मौजा हिरडामारी येथील रोडलगत असलेल्या मिथुन पान सेंटर येथे लाच रक्कम 2,000 रु. पंचासमक्ष स्वीकारली आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन – गोरेगाव, जिल्हा गोंदिया येथे गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर ला. प्र. वि. नागपूर, मधुकर गिते, अप्पर पोलीस अधीक्षक ला. प्र. वी. नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा कारवाई पथक पोलीस उप अधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, स.फौ. विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे, पो हवा. मंगेश काहलकर, नापोशी संतोष शेंडे, संतोष बोपचे ,अशोक कापसे ,संगीता पटले चालक दीपक बतबर्वे सर्व ला.प्र.वि. गोंदिया. यांच्या पथकाने केली.