मुंबई – ‘गौतमी पाटील’ हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते.
आपल्या लावणीमुळे धुमाकूळ घालत संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील हिची लोकप्रियता दिवसेंदिवस आणखीच वाढत आहे.गौतमीच्या अदाकारीवर तरुणाई अक्षरशः घायाळ झाल्याचं दिसून येत आहे. तर, दुसरीकडे डान्स दरम्यान केलेलं अंगविक्षेप यामुळे तिच्यावर टीका देखील करण्यात येत. अश्यातच आता निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदुरीकर महाराज यांनीही गौतमीवर टीका केल्याचं दिसून आलं आहे. कीर्तनाच्या एका कार्यक्रमा दरम्यान त्यांनी गौतमीवर टीका केली आहे.नुकतंच आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथील इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन पार पडले असून, यावेळी बोलताना ते म्हणाले, “कीर्तनकारांनी 5 हजार रुपये मागितले तर काय खरं आहे त्यांचं, असं म्हणतात.
पण तिकडे तीन लाखाला तीनच गाणी ऐकतात आणि 300 पोरांच्या चडड्या फाटतात. 200 पोरांचे गुडघे फुटतात. शेतकरी तुम्ही बोलयाचे नाही.आम्ही रस्त्यावर कीर्तन करतो. आमचं जीवन वाऱ्यावर. आम्हाला काय संरक्षण आहे? आम्हाला विमा नाही. जे जे लोक खरं काम करतात त्यांचा भोंग्या करायचा. तुम्ही बधिर आहे, म्हणून चाललंय सगळं. मी गेल्यावर कळेल तुम्हाला हा काय बोलत होता..’ असं इंदुरीकर महाराज म्हणाले. यावेळी त्यांनी नाव न घेता गौतमीवर टाकल्याचं दिसून आलं.