बायको घरी अन् प्रेयसीला भेटायला गेला 3 लेकारांचा बाप, गावकऱ्यांनी पाहिलं आणि असं काही केलं की..


बिहार, 11 मार्च : बिहारमधील जमुई जिल्ह्यातील एका दुर्गम गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन मुलांचा बाप असलेला विवाहित तरुणाने होळीच्या दिवशी आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गावी पोहोचला, तर गावकऱ्यांनी दोघांनाही पाहिले आणि लग्न लावून दिले. या घटनेमुळे गावात एकच चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जमुई जिल्ह्यातील लक्ष्मीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलातंड गावात ही घटना घडली. सुखासन गावात राहणारा 30 वर्षीय अजय यादव होळीच्या रात्री त्याची मैत्रीण सावित्री कुमारीला भेटण्यासाठी त्याच्या गावी आला होता. दोघांना भेटताना पाहून गावकऱ्यांना राग आला. त्यांनी दोघांनाही जाब विचारला, त्यानंतर वाद झाला आणि अखेर गावकऱ्यांनी जमून त्या दोघांचं लग्न लावून दिलं.
सावित्रीच्या मैत्रिणीचेही दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते, पण तिचा पती काही कारणास्तव सोडून गेला होता. सावित्री तिच्या आई-वडिलांसोबत राहायची. गावकऱ्यांनी विवाहित प्रियकराचा त्याच्या प्रेयसीसोबत लग्न लावून दिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोघेही कबुल करत आहेत की, त्यांच्यामध्ये अनेक महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू आहे, तर लग्नानंतर दोघेही फरार आहेत. तर अजय यादवचे कुटुंबीय चिंतेत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, होळीच्या रात्री प्रियकर अजय यादव हा बुधवारी दुपारी त्याची मैत्रीण सावित्री कुमारीला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. गावकऱ्यांनी त्याला सावित्रीला भेटताना रंगेहात पकडले. अजय यादव आणि सावित्रीमध्ये अनेक महिन्यांपासून प्रेमसंबंध सुरू होते. अजय त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी गावी नियमित जात असे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोघांनीही एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि स्वतःच्या इच्छेनुसार लग्न करण्याबाबत बोलत आहेत. व्हिडिओमध्ये अजय यादव म्हणत आहे की, त्याने सावित्रीशी एक वर्षापूर्वीच लग्न केले आहे. या लग्नानंतर दोघे कुठे आहेत, हे कोणालाच माहीत नाही.