देसाईगंज येथे आंबेडकर वॉर्डातील बौद्ध बांधवानी सम्राट अशोक यांची2327 वि जयंती साजरी करण्यात आली


दि.29/03/2023 ला. मिलिंद बौद्ध विहार,आंबेडकर वार्ड,देसाईगंज येथे संपूर्ण जगातील एकमेव चक्रवर्ती धम्मदायाद सम्राट अशोक यांची 2327 वी जयंती साजरी करण्यात आली.जयंती समारोह कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आयु.उद्धवराव खोब्रागडे यांनी भूषविले तसेच प्रमुख अतिथी आयु.प्रकाश सांगोले अध्यक्ष कोअर कमिटी, आयु साजन मेश्राम कोअर कमिटी उपाध्यक्ष, आयु. डाकराम वाघमारे बौद्ध समाज कोअर कमिटी सल्लागार तसेच आयु.राजरत्न मेश्राम कोअर कमिटी सल्लागार आशिष दादाजी घुटके कोअर कमिटी सदस्य यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे कोअर कमिटी सदस्य भीमराव नगराळे, विजय पिल्लेवन, माजी नगराध्यक्ष शामभाऊ उईके प्रामुख्याने उपस्थित होते त्याचप्रमाणे वॉर्डातील बहुसंख्य मान्यवर कार्यक्रमात उपस्थित होते कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे संचालन आयु.दिलीप शेंडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु.प्रवीण रामटेके यांनी केले.