✍️ गेल्या काही दिवसांपासून गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशातच आता केंद्र सरकारने LPG गॅस सिलिंडरवर सबसिडी जाहीर केली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हि सबसिडी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
💁♀️ *पहा काय सांगितले केंद्र सरकारने*
💫 उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र सरकारने प्रति एलपीजी सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी एक वर्षासाठी वाढवली आहे. हे अनुदान 14.2 किलोच्या 12 एलपीजी सिलेंडरवर देण्यात येणार आहे. 1 एप्रिल म्हणजेच नव्या आर्थिक वर्षात ही सबसिडी लागू होणार आहे.
💵 केंद्र सरकारकडून प्रत्येक सिलिंडरवर 200 रुपयांचे अनुदान मिळते. म्हणजेच केंद्र सरकारकडून एका वर्षात सबसिडीच्या स्वरूपात लाभार्थ्यांना 2400 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.