मुरूमगाव ते फुलकोडो दरम्यान अज्ञात वाहनाची जोरदार धडक , एक जागीच ठार तर 2 जखमी


धानोरा: मुरूमगाव ते फुलकोडो दरम्यान अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात एक युवक गुड्डू नैताम (३५) हा युवक जागीच ठार झाला, त्याच दुचाकी वर स्वार असलेले महेंद्र नैताम(३७), हा व एक इसम जखमी झाले सदर घटना 11 मार्च च्या सायंकाळी सहा वाजे दरम्यान घडली. रीडवाही येथील नैताम कुटुंबातील हे तिघे बांबू कटाई ची पासिंग करण्यास फुलकोडो येथे दुचाकी क्रमांक MH- ३३L -९९१७ ने काम आटोपून परत रीडवाही कडे जात असताना सदर अपघात झाला.जखमी ना प्राथमिक करून पुढील उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.