अन् पोलिसांनी केला दारूच्या गाडीचा पाठलाग 100,125 किलोमिटर



प्रतिनिधी / गडचिरोली : २९ मार्च २०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर चामोशी हद्दीतील दारू तस्कर शंकर अन्ना हा त्यांचे सहकाऱ्यांच्या मार्फतीने चंद्रपूर जिल्हयातुन मोठया प्रमाणात दारूची खेप आणणार आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी हरणघाट मार्गावर रात्री दरम्यान सापळा रचुन नाकाबंदी लावली असता दारुचे वाहतुक करीत असलेल्या पिक अप वॅनने पोलीसांच्या इशान्यास न जुमानता बॅरीकेटस तोडुन पळ काढला. परंतु पोलीसांनी क्षणाचा विलंब न करता त्या वाहनाचा पाठलाग सुरु केला. अवैध दारु वाहतुक करीत असलेल्या वाहन चालकाने कारवाई टाळण्याकरीता त्याचे ताब्यातील वाहन जंगल मार्गाने तसेच पोस्टे चामोशी व पोस्टे आष्टी येथील वेगवेगळ्या गावात नेले.

परंतु पोलीसांनी १०० ते १२५ किमी सतत पाठलाग केल्याने वाहन चालक व त्याच्या साथीदाराने वाहन पोस्टे चामोशी हद्दीतील सोनापुर या गावाजवळ सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीसांनी त्यांचा पाठलाग करून चाहन चालका सोबत असलेल्या अमित बारई रा. गौरीपुर ता. चामोर्शी यास ताब्यात घेतले. परंतु वाहनचालक राकेश मशीद रा. गौरीपुर ता. चामोशी अंधाराचा फायदा घेऊन घटना स्थळावरून फरार झाला. सदर वाहनात देशी दारुच्या १३९ पेट्या व विदेशी दारूच्या ५ पेटया दिसुन आल्याने पोलीसांनी सदर दारुचा मुद्देमाल व वाहतुकी करीता वापरलेले पिकअप वाहन असे १७,८१,६००/- रुपयांचा मुद्देमाल कारवाई करुन जप्त केला.

संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्ट चामोशी येथे दिलेल्या तक्रारी वरुन कलम ३५३ भादंवि सहकलम ६५ (अ), १८ (२), ८३ मदाका सहकलम १८४ मौवाका अन्वये आरोपी शंकर अन्ना रॉय, राकेश मशीद व अमीत बारई यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करून आरोपी अमीत बारई यास अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधिक्षक प्रशासन कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे व अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि राहुल आव्हाड, पोउपनि दिपक कुंभारे, नापोअ/ अकबर पोयाम, पोअ/प्रशांत गरफडे, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, मंगेश राऊत, सुनिल पडावार, सचिन घुबडे, चानापोअ / मनोहर येलम, शगीर शेख यांनी केलेली आहे..

VNX नवीन